
देशात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या 24 तासांत 11466 नवे रुग्ण आढळले, तर 460 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट एक टक्क्यांखाली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी दर) 98.25 टक्क्यांवर गेला आहे.
कोरोना लसीकरण मोहिमेला जनतेचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे देशभरात संसर्ग आटोक्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पेंद्रीय आरोग्यमंत्रालयाने गेल्या 24 तासांतील आकडेवारी जाहीर केली.
z 24 तासांत बुधवारी सकाळी आठपर्यंत 11466 नवे रुग्ण आढळले. 20 हजारांपेक्षा कमी रुग्णसंख्या आढळण्याचा हा सलग 33वा दिवस आहे. z ऑक्टिव्ह रुग्णसंख्या 1 लाख 39 हजारांवर आहे. 264 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. z देशात 46 दिवसांपासून पॉझिटिव्हिटी रेट 2 टक्क्यांपेक्षा कमी आहे. मृत्यूदर 1.34 टक्के आहे.

























































