
ओमायक्रोनसह कोरोनाचाही संसर्ग पुन्हा झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरे पुन्हा बंद करण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.
डॉ. भारती पवार या तुळजापूर येथे दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबद्दल चिंता व्यक्त केली. ओमायक्रोन रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने घातलेले निर्बंध सर्व राज्यांना बंधनकारक असल्याचेही त्या म्हणाल्या. लॉकडाऊन करायचे की नाही याचा निर्णय राज्यांनी घ्यायचा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या याच गतीने वाढल्यास मंदिरे पुन्हा बंद होऊ शकतात असे डॉ. पवार म्हणाल्या.






























































