महाराष्ट्रात कोरोना वाढतोय! 9855 नवे रुग्ण आढळले

राज्यात कोरोना पुन्हा वाढतोय. कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज दिवसभरात 9 हजार 855 नवे रुग्ण आढळले तर 42 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 93.77 टक्के इतके असून आज 6 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील मृत्यूदर 2.40 टक्के इतका आहे.

आजपर्यंत राज्यात 1 कोटी 65 लाख 9 हजार 506 नमुन्यांची तपासणी केली गेली. त्यातील 13.20 टक्के म्हणजेच 21 लाख 79 हजार 185 नमुने पॉझिटिव्ह आले. सध्या राज्यात 82 हजार 343 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. साडेतीन लाखांपेक्षा जास्त व्यक्तींना त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे तर 3701 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.  नागपूरमध्ये 24 तासांत 1152 तर पूर्व विदर्भात एकूण 1366 बाधित रुग्ण आढळले. 6 जणांचा मृत्यू झाला. सध्या नागपूर जिह्यात 9295 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर  उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या