महाराष्ट्रात कोरोनाच्या बालरुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणीय वाढ नाही; आरोग्य विभागाचा खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोनाला बळी पडलेल्या 18 वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे 2021 मध्ये सुमारे 0.07 टक्के इतके आहे, यावरून लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसऱ्या लाटेत बालकांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यस्तरीय बालरोगतज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकार बालकांवरील उपचारांच्या दृष्टीने रुग्णालयस्तरावर पायाभूत सुविधा, यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करीत असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

एकूण कोरोनाबाधीतांमध्ये कोरोना संसर्गित मुलांचे प्रमाण 

  • नोव्हेंबर 2020 ते एप्रिल 2021 दरम्यान वयोगटानुसार बाधीतांचे प्रमाणे असे आहे- शून्य ते पाच 1.3 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.4 टक्के, बारा ते सतरा 4.1 टक्के, एकूण 7.8 टक्के.
  • नोव्हेंबर 2020 (वयोगट शून्य ते पाच वर्षे 1.3 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.1 टक्के, बारा ते सतरा वर्षे 3.5 टक्के, एकूण 6.9 टक्के)
  • डिसेंबर 2020 (वयोगट शून्य ते पाच वर्षे 1.1 टक्के, सहा ते अकरा वर्षे 1.9 टक्के , बारा ते सतरा वर्षे 3.3 टक्के, एकूण 6.3 टक्के)
  • जानेवारी 2021 (वयोगट शून्य ते पाच वर्षे 1.1 टक्के, सहा ते अकरा वर्षे 1.7 टक्के, बारा ते सतरा वर्षे 3.2 टक्के, एकूण 6.0 टक्के)
  • फेब्रुवारी 2021 (शून्य ते पाच वर्षे 1.18 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.00 टक्के, बारा ते सतरा वर्षे 4.08 टक्के, एकूण 7.26 टक्के)
  • मार्च 2021 (शून्य ते पाच वर्षे 1.10 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.04 टक्के, बारा ते सतरा वर्षे 3.64 टक्के, एकूण 6.78 टक्के)

एप्रिल 2021 (वयोगट शून्य ते पाच वर्षे 1.42 टक्के, सहा ते अकरा वर्षे 2.62 टक्के, बारा ते सतरा वर्षे 4.34 टक्के, एकूण 8.38 टक्के) या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसून येते की कोरोना संसर्गित बालकांचे प्रमाण गेल्या सहा महिन्यात जवळपास तेवढेच राहिले आहे.

नगर जिल्ह्यातील संसर्गाची स्थिती काहीशी अशीच आहे. मार्च 2021 मध्ये (शून्य ते पाच वर्षे वयोगटात 188 रुग्ण होते, ते एकूण रुग्णांच्या 1.01 टक्के होते, सहा ते दहा वर्षे वयोगटातील 270 रुग्ण, एकूण प्रमाण 1.45 टक्के, अकरा ते अठरा वर्षे वयोगटात 1173 रुग्ण, एकूणात प्रमाण 6.28 टक्के, शून्य ते अठरा वर्षे वयोगटात 1631 रुग्ण एकूणात प्रमाण 8.74 टक्के, कोरोनाचे एकूण रुग्ण 18 हजार 669)

  • एप्रिल 2021 मध्ये (शून्य ते पाच वर्षे वयोगटात 757 रुग्ण, एकूण रुग्णांच्या 0.98 टक्के, सहा ते दहा वर्षे वयोगटात 1510 रुग्ण, एकूणात प्रमाण 1.95 टक्के, अकरा ते अठरा वर्षे वयोगटात 5340 रुग्ण, एकूणात प्रमाण 6.90 टक्के, शून्य ते अठरा वर्षे वयोगटात 7607 रुग्ण एकूणात प्रमाण 9.83 टक्के, कोरोनाचे एकूण रुग्ण 77 हजार 344)
  • मे 2021 मध्ये (शून्य ते पाच वर्षे वयोगटात 1076 रुग्ण एकूण रुग्णांच्या 1.33 टक्के, सहा ते दहा वर्षे वयोगटात 1918 रुग्ण, एकूणात प्रमाण 2.37 टक्के, अकरा ते अठरा वर्षे वयोगटात 6422 रुग्ण, एकूणात प्रमाण 7.95 टक्के, शून्य ते अठरा वर्षे वयोगटात 9416 रुग्ण एकूणात प्रमाण 11.65 टक्के, कोरोनाचे एकूण रुग्ण 80 हजार 785)

यावरून हे दिसून येते की 18 वर्षांखालील मुलांमधे संसर्गाचे प्रमाण साधारणपणे सारखेच आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्या वाढीमुळे बालकांच्या संसर्गातील वाढ दिसून आली आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.