अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे 8 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 226 वर

499

मुंबईहून अमरावती जिल्ह्यात दाखल झालेला 30 वर्षीय तरूणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यासह सोमवारी एकूण 8 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या आता 226 झाली असून त्यापैकी 124 रूग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. तसेच 15 रूग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 87 रूग्ण उपचारासाठी कोविड रूग्णालयात दाखल आहेत.

सोमवारी मिळालेल्या अहवालात दसरा मैदान येथील 10 वर्षीय बालकाचा समावेश असून त्याचा मामा यापूर्वी कोरोनाबाधित आढळला होता. त्याच्या संक्रमणामुळे आता भाच्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारा येथील पोलीस शिपाई कोरोनाबाधित आढळला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात बुधवारा येथील वडील व मुलासह इतर तीनजण व एक महिला पॉझिटिव्ह आली आहे. चेतनदास बगीचा येथील वडील व मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात कोल्हा काकडा गावातील 30 वर्षीय तरुण कोरोनाबाधित आढळून आला आहे. तो तरुण 21 तारखेला मुंबईहून काकडा गावात आला होता. त्याला प्रथम क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याला अमरावतीच्या कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या