राज्यात पुन्हा कोरोना रुग्णवाढ; दिवसभरात 5600 नवीन रुग्ण, 5027 रुग्ण कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीनंतर वाढ झालेली कोरोना रुग्णांची संख्या मागील तीन दिवसांत घटत असतानाच आज दिवसभरात रुग्णांत वाढ झाली. दिवसभरात राज्यात कोरोनाचे 5600 नवीन रुग्ण आढळले असून 5027 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 16 लाख 15 हजार 208 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे होण्याचे प्रमाण 92.52 टक्के इतके आहे.

राज्यात सध्या 88 हजार 537 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात 111 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर 2.58 टक्के इतका आहे. आतापर्यंत 1 कोटी 9 लाख 89 496 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 32 हजार 176 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 47 हजार 791 व्यक्ती होम क्वॉरंटाइन असून 6073 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाइन आहेत.

मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 877 रुग्ण

मुंबईत आज दिवसभरात 877 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 205 जण कोरोनामुक्त झाले. मात्र, विविध दीर्घकालीन आजार असलेल्या 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईत 20 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 10 हजार 839 झाली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणार्यांची एपूण संख्या 2 लाख 57 हजार 348वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर आले आहे.

तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 222 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 13 हजार 60 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 19 लाख 24 हजार 111 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 82 हजार 811 वर पोहोचली आहे.

देशात 89 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनातून झाले बरे, रिकव्हरी रेटची 94 टक्क्यांवर मजल

देशात सलग तिसऱया दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 40 हजारांच्या खाली नोंद झाली. एकीकडे एपूण रुग्णसंख्या 95 लाखांच्या आसपास गेली असली तरी यातील 89 लाखांहून अधिक लोक कोरोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा राष्ट्रीय रिकव्हरी रेट 94 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला आहे.