कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय कमी, 27 दिवसांनंतर आढळले तीन लाखहून कमी रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात तीन लाखहून कमी रुग्ण आढळले आहेत. 27 दिवसांनंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये घट झाली आहे.

गेल्या 24 तासांत देशात 2 लाख 81 हजार रुग्ण आढळले आहेत. तर 3 लाख 78 हजार 741 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 4 हजार 10६ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 2 लाख 74 हजार 390 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 35 लाख 16 हजार 997 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत 18 कोटी 29 लाख 26 हजार 460 कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्या आहेत.