कोरोनाची दुसरी लाट जीवघेणी, ‘या’ 10 गोष्टींचे कटाक्षाने करा पालन

देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून रोजच लाखांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. तसेच मृतांचा आकडाही वाढताना दिसत आहे. अनेक राज्यातील परिस्थिती चिंताजनक असून कडक निर्बंधही लादण्यात येत आहे.

कोरोनाची दुसरी लाट अधिकच जीवघेणी होत असून रुप बदलणाऱ्या स्ट्रेनमुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतरही अनेकांना याची लागण होत आहे. त्यामुळे काही गोष्टींचे कटाक्षाने पालन करण्याची गरज आहे.

1. तुम्ही जर बाहेरून जेवण मागवणार असाल तर सावध रहा. शक्यतो ऑनलाईन पेमेंट करा आणि रोखीचे व्यवहार कमी ठेवा. तसेच ऑर्डर स्वीकारण्यापूर्वी हातात ग्लोअज घाला.

2. बाहेरून आल्यानंतर किंवा बाहेरून एखादी वस्तू आणल्यानंतर हात सॅनिटाईज करा. हात साबणाने स्वच्छ धुवा.

3. कोरोनाचे लक्षण दिसल्यानंतर घरातील सदस्यांच्या संपर्कात येऊ नका. स्वत:चे कपडे आणि भांडी देखील घरातील सदस्यांच्या संपर्कात येणार नाही असे ठेवा.

4. वन टाईम यूज अर्थात एकदा वापरून फेकून देता येईल असा मास्क वापरत असाल तर तो कुठेही फेकू नका. त्यामुळे रोगराई पसरू शकते. त्याची योग्य विल्हेवाट लावा.

5. घरातील एखाद्या सदस्याला कोरोनाची लागण झाली असेल तर लहान मुलं, वृद्ध आणि गर्भवती महिलांना त्यापासून जास्त धोका असल्याने त्यास त्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका.

6. कोरोना रुग्णाच्या प्रातर्विधी, अंघोळ आणि जेवणाची स्वतंत्र व्यवस्था करा. घरातील आणि बाहेरच्या व्यक्तीला त्याच्या संपर्कात येई देऊ नका. त्या व्यक्तीने वापरलेल्या गोष्टी सॅनिटाईज करा. त्या व्यक्तीसह घरातील सदस्यांनाही मास्क वापरण्यास सांगा.

कोरोनाची लस घेण्याआधी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका, तज्ञांचा इशारा

7. कोरोनाची लक्षणे दिसल्यास तात्काळ सरकारी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा किंवा जवळच्या रुग्णालयात धाव घ्या.

8. मित्र, नातेवाईक यांना भेटण्याऐवजी सध्यातरी सोशल मीडियाचाच आधार घ्या. तसेच भेट घेतली तरी सुरक्षित अंतर राखा आणि मास्कचा वापर करा. तसेच हात मिळवणे, आलिंगन देणे टाळा.

CDC चा अहवाल; ‘या’ तीन प्रकारच्या लोकांवर कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स जास्त, जाणून घ्या

9. बाहेरून आल्यावर फोन, हेडफोन, घराची, गाडीची चावी यासारख्या गोष्टीही सॅनिटाईज करा. लिफ्टमध्ये बटणांना हात लावण्यापूर्वी ग्लोअज वापरा किंवा चावीचा वापर करा किंवा पायऱ्यांचा वापर करा.

10. किराणा सामान, भाजीपाला आणल्यानंतर सॅनिटाईज करून घ्या. फळं मिठाच्या पाण्याने धुवून नंतर स्वच्छ पाण्याने धुवा आणि मगच सेवन करा.

कोरोनाची लस घेतल्यानंतर ‘या’ 5 गोष्टी बिलकूल करू नका, साइड इफेक्ट्सबाबत WHO म्हणते…

आपली प्रतिक्रिया द्या