साताऱ्यात दोन  कोरोना संशयित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संशयित म्हणून सातारच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या दोन रुग्णांच्या तपासणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील 57 वर्षीय एका महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आणि पॅरिस येथून प्रवास करुन आलेल्या 35 वर्षीय पुरुषाला कोरडा खोकला असल्याने जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या दोन अनुमानित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट मिळाले असून त्यांना कोविड 19 चा बाधा नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.