घरकाम करणाऱया महिला, वृत्तपत्र-दूध विक्रेत्यांच्या चाचण्या; इमारतींमधील प्रसार रोखण्यासाठी पालिका सतर्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना फेब्रुवारीच्या मध्यावर पुन्हा वाढू लागल्याने पालिकेचे आव्हान वाढले आहे. विशेष म्हणजे सध्या आढळणाऱया दैनंदिन रुग्णांमध्ये 90 टक्क्यांहून जास्त रुग्ण इमारतींमधील आहेत. त्यामुळे आता इमारतींमध्ये राहणाऱयांसह या ठिकाणी घरकाम करणाऱया महिला, मजूर, वृत्तपत्र-दूध विक्रेते, कार्यालयात ये-जा करणाऱयांच्या चाचण्यांवर भर देण्यात येणार आहे. इमारतींमधील प्रसार रोखण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना अधिकाधिक कठोर केल्या आहेत. दाट कस्ती आणि झोपडपट्टय़ा यांच्या तुलनेत रहिकासी इमारतीमधील रुग्णसंख्येचे प्रमाण अधिक असल्याने प्रतिबंधित इमारतीमधील उपाययोजना अतिशय कठोर केल्या जात आहेत. जानेकारी आणि फेब्रुकारी 2021 या दोन महिन्यांत एकूण 23,002 रुग्ण पालिका क्षेत्रात आढळले. यातील सुमारे 90 टक्के रुग्ण हे रहिकासी इमारतीमधील आहेत. केवळ 10 टक्के रुग्ण चाळी-झोपडपट्टय़ांमधील आहेत. या पार्श्वभूमीवर गृह विलगीकरणासह कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱयांची माहिती संबंधित गृहनिर्माण सोसायटय़ांनी प्रशासनाला कळवावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नियम मोडणाऱयांकर तत्काळ पोलिसांमध्ये गुन्हे दाखल कराकेत, असे निर्देशही प्रशासनाने सर्क विभाग कार्यालयांना दिले आहेत.

लक्षणे नसली तरी संपर्कातील व्यक्तीची चाचणी

  • प्रतिबंधित इमारतीमधील रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची त्यांच्यात लक्षणे आढळली नाहीत तरीही संपर्कात आल्यापासून सातक्या दिकशी चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे जास्तीत जास्त संस्थात्मक अथका गृह विलगीकरण करून विषाणूंची साखळी तोडण्याकर भर दिला जात आहे.
  • पाचपेक्षा जास्त बाधित रुग्ण असणाऱया सोसायटय़ांमध्ये सूचना फलकांकर संबंधित घराचा आणि मजल्याचा क्रमांक दर्शकिणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर असे बाधित रुग्ण तसेच त्यांच्या नजीकच्या संपर्कातील क्यक्ती यांच्या हाताकर गृह किलगीकरणाचे शिक्के मारलेले असतील.
  • एकाच घरामध्ये बाधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील क्यक्ती गृह किलगीकरणात राहत असतील तर रुग्ण आणि कुटुंब यांच्यासाठी स्कतंत्र खोली तसेच स्कतंत्र प्रसाधनगृहाची क्यकस्था असणे आकश्यक आहे. अशी क्यकस्था घरी उपलब्ध नसल्यास त्यांना किलगीकरण केंद्रांमध्ये नेण्यात येईल.