कोरोना टेस्ट आता 350 रुपयांमध्ये; राज्य सरकारने कमी केले चाचण्यांचे दर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा संसर्ग उतरणीला लागल्याचे दिसत असले तरी ओमाक्रोनचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने आरटीपीसीआर चाचण्यांचे दर आखणीन कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता खासगी लॅबमध्ये आरटीपीसीआर चाचणीचा दर 350 रुपये केला आहे तर रुग्णाच्या घरी जाऊन नमुना घेतल्यास 700 रुपये दर निश्चित केला आहे.

भारतीय आयुर्विज्ञान संस्था व एनबीएलमान्यताप्राप्त खासगी कोविड प्रयोगशाळांमधील कोविड टेस्टसाठी असलेल्या आररटीपीसीआर चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली होती. त्यानुसार मार्चमध्ये कोविड चाचण्यांचे दर निश्चित केले होते. त्यानुसार लॅबमध्ये आरटीपीसीआर चाचणीचा दर 500 रुपये तर घऱी जाऊन सँपल घेतल्यास 800 रुपये दर निश्चित केला होता. सर्व खासगी प्रयोगशाळांसाठी हा दर बंधनकारक केला होता.

मात्र ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत औषध निर्माण कंपन्या, वाहतूक सेवाही सुरळीत सुरु झाली. त्यामुळे खर्चही कमी झाला आहे. परिणामी खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्यांसाठी येणारा खर्चही कमी झाला. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्यांचे दर कमी करण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. आरटीपीसीआरसोबत अँटीबाँडीज चाचण्यांचे दर कमी केले आहेत.

पूर्वीचे दर व नवीन दर पुढीलप्रमाणे–

  • लॅबमध्ये सँपल घेतल्यास पूर्वीचा दर 500 रुपये- चाचणीचा नवीन दर 350 रु.
  •  कोविड केअर सेंटर, रुग्णालय, क्वारंटाईन सेंटरमधून रुग्णाचा नमुना घेतल्यास पूर्वीचा दर 600 रुपये- चाचणीचा नवीन दर 500 रु.
  • रुग्णाच्या घरी जाऊन नमुना घेतल्यास पूर्वीचा दर 800 रु.-नवीन दर 700 रु.

अँटीबाँडीज चाचण्यांचे दरही कमी केले आहेत

  • रँपिड अँटीजन टेस्ट फाँर सार्स कोविड टू- 100 रुपये (रुग्णाच्या घरी जाऊन केल्यास 250 रु.)
  • एलायसा फॉर सास्र कोविड टू अँटीबाँडीज – 200 रु., (रुग्णाच्या घरी जाऊन केल्यास 350रु.)