
कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय. आता सप्टेंबरमध्ये तिसरी धडकणार. पहिल्या दोन लाटांपेक्षाही तिचा तडाखा जबरदस्त असेल. ऑक्टोबरमध्ये तर ती रौद्ररूप धारण करेल. या तिसऱया लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसणार आहे. त्यामुळे आतापासूनच सतर्क रहा, आरोग्य सुविधा तयार ठेवा, असा इशारा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने (एनआयडीएम) केंद्र सरकारला दिला आहे.
कोरोनाच्या लाटेवर लाटा येत आहेत. पहिली गेली. दुसरी ओसरली. आता पुढील महिन्यात तिसरी येईल, असा इशारा नीती आयोगाने रविवारीच केंद्र सरकारला दिला होता. दिवसाला पाच लाख रुग्ण सापडतील आणि त्यातील 23 टक्के रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांत भरती करावे लागेल. त्यासाठी 2 लाख आयसीयू बेड तयार ठेवा, असा सल्ला नीती आयोगाने दिला होता. त्याच्या दुसऱयाच दिवशी आज ‘एनआयडीएम’नेही पंतप्रधान कार्यालयाला असाच अहवाल सादर केला.
‘एनआयडीएम’ हे पेंद्रीय गृह खात्याच्या अखत्यारित येते. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला ‘थर्ड वेव्ह प्रिप्रेअर्डनेस – चिल्ड्रेन व्हल्नरेबिलिटी अॅण्ड रिकव्हरीज’ हा अहवाल सादर केला आहे. लहान मुलांसाठी तिसरी लाट अधिक धोकादायक आहे आणि त्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत याची सविस्तर माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
देशात लसीकरण मोहिमेला वेग आला असला तरी आतापर्यंत वयोवृद्ध, प्रौढ आणि तरुण पिढीपर्यंतच लस दिली गेली आहे. त्यातही अनेकांचे लसीकरण बाकी आहे. लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. दुसऱया लाटेत शारीरिक व्याधी असलेल्या आणि किमान प्रतिकारशक्ती असलेल्या 60-70 टक्के मुलांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. देशातील प्राथमिक आरोग्य पेंद्रांमध्ये 82 टक्के बालरोगतज्ञांची कमतरता आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी सांगितले आहे.
तिसऱया लाटेसाठी महाराष्ट्राची तयारी
सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येईल, असा इशारा नीती आयोग तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाने दिला असला तरी महाराष्ट्राने त्यासाठी मे महिन्यापासूनच तयारी सुरू केली आहे. ठिकठिकाणी लहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर्स उभारली जात आहेत. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासाठी आग्रही आहेत. औषधांचा पुरेसा साठा करून ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्राने केलेल्या तयारीमुळेच दुसऱया लाटेचा आपण सक्षमपणे सामना करू शकलो. तिसऱया लाटेसाठीही आपण तयार आहोत. फक्त ऑक्सिजन निर्मितीवर मर्यादा आहेत, त्याप्रमाणेच डॉक्टरांची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे त्यानुसारच आपल्याला नियोजन करावे लागणार आहे.
– डॉ. सुहास प्रभू, पिडियाट्रीक कोविड टास्क फोर्स प्रमुख
गरज भासल्यास बालरोगतज्ञांचे आऊटसोर्सिंग
तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग पूर्ण तयार आहे. लसीकरणावर भर देण्यात आला आहे. रुग्णसंख्या वाढली तर टेस्टिंग वाढवल्या जातील आणि त्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळाही तयार आहेत. लहान मुलांना अधिक बाधा झाली तर बालरोगतज्ञांच्या टीम आहेत. कोरोनाग्रस्त बालरुग्णांची संख्या वाढलीच तर खासगी क्षेत्रातून बालरोग तज्ञांचे आऊटसार्सिंग केले जाईल. दुसऱया लाटेमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये 0 ते 18 वयोगटातील 10 टक्के रुग्णांचा समावेश होता.
– डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महानगरपालिका
अहवालातील सल्ले
- तिसऱया लाटेत लहान मुलांना सर्वांत जास्त धोका असल्यामुळे बालरोगतज्ञ, कर्मचारी, व्हेंटिलेटर्स, रुग्णवाहिका यांची फौज तयार ठेवा.
- शारीरिक व्याधी असलेल्या तसेच दिव्यांग मुलांचे प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे.
- लहान मुलांसाठी विशेष कोरोना वॉर्ड पिंवा केंद्रे तयार करावीत. मुलांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे म्हणून त्या ठिकाणी पालकांनाही राहण्याची व्यवस्था केली जावी.
लहान मुलांसाठी ही लाट घातक
तिसऱया लाटेने लहान मुलांना विळखा घातला तर त्यांना पुरेसे उपचार देण्याइतकी देशातील आरोग्य यंत्रणा अजूनही सक्षम झालेली नाही.



























































