
राज्यभरात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत असतानाच मुलांचे लसीकरण कधी होणार याची चिंता पालकांना सतावत आहे. अशा पालकांसाठी दिलासादायक बातमी असून 2 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी लवकरच कोव्हॅक्सिनला परवानगी मिळणार आहे. ही लस बनवणाऱया भारत बायोटेक कंपनीने लहान मुलांवरील चाचणीचा अहवाल डीसीजीआयला पाठवला आहे. हा अहवाल मंजूर झाल्यास लहान मुलांवरील लसीकरणासाठी आपत्कालीन वापरास या लसीला मान्यता मिळेल.
डब्लूएचओचीही लवकरच मंजुरी मिळणार
जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्लूएचओ) कोव्हॅक्सिनला याच महिन्यात मंजुरी दिली जाईल, असा विश्वास डॉ. एल्ला यांनी व्यक्त केला आहे. डब्ल्यूएचओला भारत बायोटेककडून आवश्यक अशी सर्व माहिती डब्ल्यूएचओला 9 जुलै रोजी सुपूर्द केली आहे. डब्ल्यूएचओकडून कोव्हॅक्सिनला मंजुरी मिळाली तर ही लस घेतलेल्या नागरिकांना क्वारंटाइन नियमांचे पालन न करता परदेश यात्रा करणे शक्य होणार आहे.






























































