देशभरात लस पोहचविण्यासाठी वायुसेनेचा रोडमॅप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी हवाई दलानें कंबर कसली आहे. दुर्गम आणि अती दुर्गम भागात लस पोहोचविण्याचे काम सैन्यामार्फत होणार आहे. हवाई दलाच्या मुख्यालयाने या लसींच्या वाहतुकीसाठी देशव्यापी मोहीम तयार केली असून देशातील 28 हजार पूल सेंटरवर ही लस पोहचविसाठी हवाई दलाने विमाने तैनात केली आहेत.

कोरोना युध्दात नागरिकांना लस उपलब्ध व्हावी याकरिता हवाई दलानेही तयारी सुरु केली आहे. शासनाचा आदेश मिळताच हवाई दल लसीची विमान वाहतूक, तसेच लस वितरण केंद्रातून देशाच्या शेवटच्या टोकापर्यत आणि दुर्गम भागापर्यत पोहचविण्यासाठी हेलिकाॅप्टरने व्यवस्था करणार आहे. सूत्रांनी सांगितले की, लसीच्या विमान वाहतुकीसाठी विमानाची वाहतूक करण्याच्या पद्धती, लसी वितरण केंद्रांचे हेलिकाॅप्टरचे प्रकार आणि ’अंतिम बिंदू वितरण’ निश्चित केले गेले आहेत.

अशी सुरु आहे तयारी

लसीच्या 28 हजार कोल्ड केंद्रांवर लसीचा अधिक भार वाहून नेण्यासाठी हवाई दला कार्गो विमान सी -17 ग्लोबमास्टर, सी -136 जे सुपर हरक्यूलिस आणि आयएल-76 यासारख्या तैनात करणार आहे. तर छोटया केंद्रासाठी वर्कहॉर्स ए.एन.-32 आणि डॉर्नियर विमानाचा वापर करण्यात येणार आहे. दुर्गम भागासाठी हलके व मध्यम लिफ्ट हेलिकाॅप्टरची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी एएलएच, चिनूक, चित्ता आणि चेतक असे हेलिकाॅप्टर सहभागी होणार आहे.

आयएएफच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी वृत्तवाहिन्यांशी बोलतांना सांगितले की, लष्करी टास्क फोर्सचे कार्गो विमाने आणि हेलिकाॅप्टर्स मिशनमध्ये सहभागी असतील हे माहित नाही. परंतु सध्या या मोहिमेसाठी हवाई दल 100 पेक्षा जास्त विमान आणि हेलिकाॅप्टर राखीव ठेवली आहे. पुढे बोलताना अधिकारी म्हणाले की, हवाई दलाला लस वाहतुकीचा पुरेसा अनुभव आहे. दोन वर्षांपूर्वी वायू दलाने गोवर आणि रुबेला लस लोकांपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. नोटाबंदीच्या वेळी किंवा सर्वसाधारण निवडणुकांच्या वेळी कठीण भागात ईव्हीएम आणि कर्मचारी नेण्यासाठी ज्याप्रकारे वायू दलाने मिशन चालविले होते त्याचप्रमाणे कोरोना युध्दात हवाई लस वितरणासाठी आपली महत्वाची भुमिका बजावणार आहे.