राज्यात आतापर्यंत 14 लाख रुग्ण बरे होऊन घरी, आज 6 हजार जणांना कोरोनाची लागण

राज्यात कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 14 लाख 60 हजार 755 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात एकूण 5 हजार 648 रुग्णे कोरोनामुक्त झाले असून एकूण 6 हजार 59 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.8 टक्क्यांवर पोहचले आहे. तर राज्यात गेल्या चोवीस तासांत एकूण 112 रुग्णांच्या मृत्युची नोंद करण्यात आली असून राज्यातील मृत्यूदर 2.63 टक्के इतका नोंदविण्यात आलेला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 86 लाख 08 हजार 928 जणांचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 16 लाख 45 हजार 20 इतक्या जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.

सध्या राज्यात एकूण 1 लाख 40 हजार 486 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात 25 हजार 18 हजार 016 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत.

मुंबईत कोरोनाचे 1222 नवे कोरोनाबाधित ; 46 जणांचा मृत्यू

मुंबईत गेल्या 24 तासांत 1222 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून 46 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवसात 1013 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत आढळलेल्या नव्या रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या 251283 झाली असून मृतांचा आकडा 10062 झाला आहे. मात्र सद्यस्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांवर गेल्याने दररोज मोठय़ा संख्येने रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. आतापर्यंत मुंबईत 2 लाख 20 हजार 165 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबईत सद्यस्थितीत कोरोनाचे फक्त 19 हजार 721 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या