गेल्या 24 तासातील सर्वात मोठी वाढ, आकडा धक्कादायक

गेल्या 24 तासात देशात 29,429 कोरोनाग्रस्त वाढले असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे समोर आले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 9,36,181 वर पोहोचला आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात सध्या 3,19,840 अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त असून त्यातील 5,92,032 कोरोनाग्रस्त हे बरे झालेले आहेत. तर 23,727 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात देशात 582 जणांचा मृत्यू झाला आहे तर 19 हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असून राज्यात 2,67665 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1,07,963 रुग्ण हे अॅक्टिव्ह असून 1,49,007 रुग्ण बरे झाले आहेत. त्याखालोखाल तामिळनाडूत रुग्णांची संख्या जास्त असून तिथे 1,47,324 रुग्ण आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या