दातांवर करतोय परिणाम, कोरोनाचे नवे लक्षण

कोरोना संसर्गाचा धोका कमी झालेला नाही. त्यात कोरोनाची नवनवीन लक्षणे समोर येत आहेत. कोविड झालेल्या व्यक्तींचे दात कमजोर होऊ शकतात. हिरड्या कमजोर होऊन अचानक दात तुटण्यासारखी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. न्यूयॉर्क टाइम्समधील एका वृत्तात ही माहिती समोर आली आहे. 

कोरोनाचा संसर्ग झालेल्या काही रुग्णांमध्ये दातांची नवीनच समस्या दिसून येत आहे. कोरोना विषाणू दातांच्या रचनेला कमकुवत करत आहे. हिरड्या कमजोर होऊन अचानक दात पडत असल्याचे समोर आल्याने तज्ज्ञ मंडळी आता नव्या शोधकार्यात गुंतली आहेत. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या फराह खेमिली (43) या काही दिवसांपूर्वी कोविड बाधित झाल्या होत्या. विंटरग्रीन ब्रेथ मिंट त्यांनी खाल्ले असता हिरड्या कमजोर झाल्याचे त्यांना जाणवले आणि काही तासांमध्ये त्यांचा दात पडला. ना काही वेदना, ना रक्त आले. त्यांनी आपला हा अनुभव ऑनलाईन सपोर्ट ग्रुपमध्ये मांडला. हा अनुभव आम्ही घेतल्याचे त्या ग्रुपमधील अनेक जणांनी सांगितले. कोरोनाग्रस्तांमध्ये अशी लक्षणे दिसू शकतात असे काही दंतरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ उटाहचे डॉ. डेव्हिड ओकानो यांच्या मते कुङ्गल्याही व्यक्तीचे दात असे अचानक तुटणे हे या गंभीर आजाराचे लक्षण असू शकत. या आजारातून बाहेर पडल्यानंतरसुद्धा रुग्णावर त्याचे परिणाम दिसू शकतात. तर काही दंतरोगतज्ज्ञांच्या मते, 2012 साली सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शनच्या अहवालात अस ेम्हटले आहे की, वयाच्या तिशीनंतर 47 टक्के लोकांमध्ये हाडे कमजोर होऊन दात पडण्याची शक्यता असत. त्यामुळे या समस्येशी कोरोनाचा काही संबंध नाही.

खेमिली यांच्या सहकाऱ्याने सर्वाइव्हर कॉर्प नावाच्या एका पेजला फॉलो केले. या पेजच्या संस्थापक डायना बेरेंट यांच्या 12 वर्षाच्या मुलाचे अशाच प्रकारे दात पडल्याचे त्यांनी म्हटले आहे. या मुलामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली होती. याआधी त्याचे दात मजबूत होते, असे त्याच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. तूर्तास या विषयावर संशोधन सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या