चांगली बातमी- कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट, वाचा काय आहे आजची आकडेवारी

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा गेल्या महिन्यात तब्बल एक लाखापर्यंत पोहोचला होता. दररोज 90 हजाराच्या पुढेच कोरोनाग्रस्त देशात आढळत होते. त्यातच हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येणार असा इशारा संशोधकांनी दिला होता. त्यामुळे देशात एकंदरीत चिंतेचे वातावरण होते. मात्र आता दररोज आढळणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात तब्बल अर्धी घट झाली आहे.

गेल्या 24 तासात देशात 50,129 कोरोनाग्रस्त आढळले असून 578 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 78,64,811 वर पोहोचला आहे. त्यातील 6,68,154 अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त असून 70,78,123 कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 62,077 कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 1,18,534 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या