कुडाळमध्येही जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

568

कुडाळ तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात रविवारी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. कुडाळ शहरासह तालुक्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. कुडाळ आगाराच्या सर्व बसफेऱ्याही बंद ठेवण्यात आल्या. मुंबई – गोवा महामार्गासह तालुक्यातील सर्व रस्ते ओस पडले होते. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घरात राहणे पसंत केले. रेल्वेने कुडाळात दाखल झालेल्या प्रवाशांना कुडाळ आगाराने एस.टीची सोय करून त्यांच्या गावी पोहचविले. कुडाळ रेल्वे स्थआनक आणि बसस्थानकात आलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तहसीलदार व पोलीस प्रशासनाने तालुक्यात पेट्रोलिंग करून परिस्थितीचा आढावा घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या