
संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरू आहे. आतापर्यंत जगात कोरोना व्हायरसमुळे 3 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्थानात कोरोनाचे 30 रुग्ण आढळले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून अनेकजण मास्क लावून फिरत आहेत. परंतु मास्क कोणी लावाये याबाबत डॉक्टरांनी सूचना दिल्या आहेत.
News18 हिंदी या वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. एम वाली यांनी सांगितले की सगळ्यांनाच मास्क लावण्याची गरज नाही. फक्त दोन प्रकारच्या लोकांनी हे मास्क वापरणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पहिली व्यक्ती म्हणजे ज्याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अशा व्यक्तीने मास्क वापरावा. तसेच कोरोना विषाणू बाधित झालेल्या व्यक्ती जर जवळपास असेल तरच मास्क वापरावा अशी सूचना डॉ. वाली यांनी दिली आहे.
सामान्य माणसांनी मास्क वापरू नये असे डॉ. वाली यांनी सांगितले आहे. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपण शुद्ध हवा आत घेतो आणि वाईट श्वास बाहेर सोडतो. मास्क लावल्यामुळे आपण पुन्हा वाईट श्वास परत परत घेतो. म्हणून सामान्य माणसांनी मास्क लावण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
तापमानामुळेही कोरोना व्हायरस पसरत नाही असे डॉ. वाली यांनी सांगितले. जमल्यास आपल्या घरातील तापमान 30 डीग्रीपर्यंत ठेवावे. त्यामुळे कोरोना व्हायरस पसरत नाही असेही त्यांनी सांगितले. डॉ. वाली दिल्लीत मोठे फिजिशियन आहेत त्यांनी तीन माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा, वेंकटरमण आणि प्रणब मुखर्जी यांच्यावर उपचार केले आहेत. त्यांनी कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.
- हात धुण्यासाठी शक्यतो लिक्विड सॅनिटायझरचा उपयोग करावा
- ताण घेऊ नका
- अरोग्यवर्धक आहार घ्यावा
- पूर्ण झोप घ्यावी
- आंबट फळे खाऊ नये
- आईइस्क्रीम खाणे टाळावे
- गरम पाणी प्यावे
हिंदुस्थानातही 30 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर मार्चच्या सुरुवातीला या विषाणूने डोके वर काढून सर्वांचीच चिंता वाढवली आहे. सोमवारी दोन, तर मंगळवारी आठ संशयित रुग्णांच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळला. बुधवारी इटलीहून परतलेल्या आणखी 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. इराणमध्ये अडकलेले जे हिंदुस्थानी मायदेशी परतण्यास उत्सुक आहेत त्यांच्या तपासणीनंतर सरकार तेथेच तात्पुरती प्रयोगशाळा उभारणार आहे.
























































