लक्षणे नसलेल्या रुग्णांचे अधिक प्रमाण महामारी संपवेल, संशोधकांचा दावा

1194

कोरोनाच्या फैलावाची अख्खा जगाला चिंता असतानाच संशोधकांनी ही महामारी संपणार असल्याचे संकेत दिले आहेत. लक्षणे नसलेल्या कोरोनाच्या रुग्णांचे अधिक प्रमाण ही व्यक्ती आणि समाजासाठी एक चांगली गोष्ट आहे. अशा रुग्णांचे अधिक प्रमाण कोरोनाची महामारी संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा दावा सॅन फ्रान्सिस्कोतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधनात करण्यात आला आहे.

संसर्गजन्य रोगतज्ञ मोनिका गांधी यांच्या नेतृत्वाखाली जगभरातील कोरोनाच्या संसर्गाचा अभ्यास केला जात आहे. कोरोनाच्या महामारीत लक्षणे नसलेल्या रुग्णांचा टक्का अधिक आहे. त्याच रुग्णसंख्येच्या अनुषंगाने संशोधन केले गेले आहे. ’युनायटेड स्टेटस सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल ऍण्ड प्रिक्हेन्शन’च्या अभ्यासानुसार, गेल्या महिन्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांपैकी 40 टक्के लोकांमध्ये विषाणूची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. ही आकडेवारी कोरोनाची महामारी संपवण्यात प्रमुख भूमिका बजावणार असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. संशोधनातील निष्कर्षामुळे संशोधकांना कोरोनाचा विशिष्ट वयोगटाकर कशाप्रकारे आघात होत आहे, याचा अभ्यास करणे सोपे ठरणार आहे.

– जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, जगभरात गेल्या सात महिन्यांत कोरोना विषाणूची दोन कोटींहून अधिक लोकांना लागण झाली आहे, तर 7 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्तांचा महामारीत मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या