कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणू सर्वप्रथम अमरावतीत सापडल्याचा तज्ज्ञांचा दावा

देशात कोरोना संसर्गाचे रूग्ण मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी अधिक वेगानं वाढत आहेत.देशात कोरोनाची दुसरी लाट असल्याचे तज्ज्ञांकडुन सांगितल जातंय.हिंदुस्थानातील कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत बी.1.617 हा व्हेरियंट आढळला असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.जगभरातील तज्ज्ञांकडून या व्हेरियंटचा अभ्यास करण्यास येत आहे,मात्र अलिकडेच या व्हेरियंटबाबत नवीन माहिती समोर येत असून हा व्हेरियंट सर्वप्रथम महाराष्ट्रातील अमरावतीत आढळला असल्याचं एका अहवालानुसार समोर आलं आहे.

फेब्रुवारीमध्ये सर्वप्रथम अमरावतीत बी.1.617 हा नवा व्हेरियंट आढळला आणि त्यानंतर इतर जिल्ह्यात त्याचा संसर्ग वाढला,अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.तसेच हिंदुस्थानात आढळणाऱ्या डबल म्युटेशन असणाऱ्या व्हेरियंटबाबत अधिक संशोधन करण्यासाठी परदेशातील तज्ज्ञांनी विदर्भाकडे लक्ष केंद्रीत केले असून,अलीकडेच नागपुरातही त्यांनी भेट दिली होती,असे सांगण्यात येत.

हिंदुस्थानात आढळणारा हा व्हेरियंट युके आणि ब्राझीलच्या तुलनेत वेगळा आहे.याबाबत दुसऱ्या लाटेच्या सुरवातीला चर्चा करण्यात आली होती, अशी माहिती डॉक्टर नितीन शिंदे यांनी दिली आहे.ब्रिटनसह अनेक देशांनी हिंदुस्थानात प्रवासावर बंदी घातली आहे.याचे कारण म्हणजे बी.1.617 या व्हेरियंटचा वेगाने होणारा प्रसार तसंच,अमरावतीत कोरोना प्रादूर्भाव वाढवण्यामागेही हेच कारण असल्याचे मानले जात आहे.मात्र,याप्रकरणी अजूनही संसोधनातून सिध्द झाले नाहीये,असेही त्यांनी नमूद केले आहे.आंतरराष्ट्रीय संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार,हा व्हेरियंट डिसेंबर 2020 मध्ये घेतलेल्या नमुन्यात आढळला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या कोविड कंट्रोल सल्लागार समितीतील सदस्य असलेले यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचे डॉक्टर अतुल गवांडे यांनीही या कोरोना विषाणूच्या या नव्या व्हेरियंटबाबत चिंता व्यक्त केली आहे.कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक आहे.या लाटेत सर्व कुटुंबाच्या कुटूंब बाधित होत आहेत. विशेष म्हणजे विदर्भात कुटूंबातील सर्वच सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.हा विषाणू किती घातक आहे,याबाबत अधिक संशोधन बाकी आहे. संशोधक ग्रीस रॉबर्ट यांच्या अहवालानुसार,कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा हा विषाणू 20 टक्के अधिक संसर्गजन्य आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या