corona live update -गेल्या 24 तासांत कोरोनाचे 92 रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती

कोरोनामुळे अनेक देशांमध्ये संकट अधिकर गहिरं होत चाललं आहे. चीन, इटलीला मागे टाकत अमेरिकेमध्ये या आजाराने आता थैमान घातलं असून इथे 1 लाखांपेक्षा अधिक रुग्ण झाले आहेत. अमेरिकेमध्ये 18 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. तिथल्या मृतांचा आकडा दीड हजारच्या पलिकडे पोहोचला आहे. तर इटलीमध्ये एका दिवसात 1,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्थानातही परिस्थिती चिंताजनक बनत चालली असून रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000च्या पुढे पोहोचला होता. सध्या या आजारामुळे जगात, देशात आणि आपल्या राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत क्षणाक्षणाची अपडेट आपल्याला इथे वाचायला मिळेल.

 • गेल्या 24 तासांत कोरोनाचे 92 रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 92 रुग्ण आढळले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच चार जणांचा मृत्यू झाला आहे.

 • बाबा रामदेव यांनी पंतप्रधान सहायता निधीला 25 कोटींची मदत

 

 • अनुष्का आणि विराट करणार आर्थिक मदत

 

कोरोनाचे संकट पाहता अनुष्का शर्मा आणि विराट कोहली मुख्यमंत्री सहायता निधी आणि पंतप्रधान सहायता निधीसाठी आर्थिक मदत करणात आहेत. अनुष्का शर्माने आपल्या ट्विटरवरून हा निर्णय जाहीर केला आहे.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हि़डीओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधला
 • शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावा, मुंबई विद्यापीठाचे आवाहन
 • त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
 • या रुग्णावर एका खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू होते
 • पुण्यात करोनाचा पहिला बळी. 52 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
 • राजस्थानमध्ये रुग्णांचा आकडा 60वर, भिलवाडा येथे सर्वाधिक 25 कोरोनाग्रस्त
 • तामीळनाडूमध्ये कोरोनाचे 17 नवीन रुग्ण आढळले, राज्यात एकूण संख्या 67
 • मध्य प्रदेशमध्ये 5 हजार आरोपींना 60 दिवसांचा पॅरोल जाहीर
 • बेळगावात रस्त्यावर कोरोना जनजागृतीचे संदेश लिहून पोलिसांचे नागरिकांना आवाहन
 • मदुराई येथे लॉकडाऊन धुडकावून तिरुप्परामकुनारम मुरुगन मंदिराच्या बाहेर विवाह सोहळा
 • श्रीनगर येथील पहिल्या कोरोनाग्रस्त महिला रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह
 • या पैकी 942 जण कोरोनाबाधित असून 99 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
 • देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1071
 • आयपीएलबाबत अद्याप ठोस निर्णय नाही, परिस्थिती पाहूनच निर्णय घेण्यात येईल, बीसीसीआयची माहिती
 • कोरोनामुळे पश्चिम बंगालमध्ये एका रुग्णाचा मृत्यू
 • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मनरेगाच्या 27.5 लाख मजुरांच्या खात्यात 611 कोटी ट्रान्सफर केले आहेत.
 • लार्सन अँड टुब्रोकडून कोरोनाविरोधी लढाईसाठी पंतप्रधान निधीला 150 कोटींची देणगी
 • पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
 • संबंधित मजुरांना सध्याच्या घरात परत पाठवण्यात आले
 • 17 स्थलांतरित मजुरांना उत्तर प्रदेशमध्ये घेऊन जाणारा टेम्पो मुंबईतील अंधेरी भागात पोलिसांनी अडवला
 • 12 पैकी पाच जण पुण्याचे, तीन मुंबईचे, दोन नागपूर, तर उर्वरित दोनपैकी प्रत्येकी एक कोल्हापूर आणि नाशिकचा रुग्ण
 • महाराष्ट्रात कोरोनाचे 12 नवीन रुग्ण सापडले, रुग्णांची संख्या 215वर
 • हिंदुस्थानी सैन्यात एकाला कोरोनाची लागण, सैन्यातील हा तिसरा रुग्ण असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

 

 • गुजरातमध्ये कोरोनाचे 5 रुग्ण आढळले आहेत, तर 2 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 63 वर गेली आहे

 

 • गोव्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे.

 

 • कर्नाटकात 7 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले असून कर्नाटकातील एकूण रुग्णांची संख्या 83 वर पोहोचली आहे.

 

 • अदानी ग्रुपकडून पंतप्रधान फंडाला 100 कोटींची मदत

 

 • महाराष्ट्रातील मुंबई-ठाण्यात कोरोनाचे सर्वाधिक 107 रुग्ण

 • गेल्या 24 तासात हिंदुस्थानात 106 कोरोनाग्रस्त आढळले
 • राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत झालेली वाढ वैयक्तिक संपर्कातून. समूह संसर्गाची लक्षणे आढळलेली नाहीत. – अजित पवार
 • कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेला नाही – अजित पवार
 • महाराष्ट्रातील कोरोनाच्या 34 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

 • सर्व आपण एकत्र आहोत. एकत्र लढा देतोय. विरोधी पक्षही एकत्र आलाय. त्यामुळे या संकटाला आपण हरवणार
 • गरज असेल तरच बाहेर पडू, कुटुंबासोबत वेळ घालवा. आनंदाने हे क्षण घालवा.
 • जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात कमी नाही झाली तर कठोर पाऊले उचलणार – मुख्यमंत्री
 • गुणाकाराच्या या काळात आपल्याला विषाणूची वजाबाकी करायची आहे –
 • डॉक्टरांच्या भाषेत आपल्याला हाय रिस्क ग्रुपकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. मधुमेह असलेल्या व्यक्ती, अति स्थूल, गरोदर माता, लहान मुलं यांना सांभाळलं पाहिजे. कृपा करून या लोकांना सांभाळा
 • हा रोग आपण पहिल्या पायरीवर थांबवला तो पुढे सरकत नाही
 • सर्व डॉक्टरांना डोळ्यात तेल घालून काम करायचे आहे
 • पोलीस डॉक्टर अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांवर किती ताण वाढवायचा आहे
 • आपण पुढिल काही दिवस घरी राहू पण हे घऱी राहणार नाही. आपल्यासाठी अहोरात्र झटत राहणार आहेत.
 • सरकार आपली मदत करताना आपण देखील सरकारची मदत करा
 • शिवभोजन पुढिल तीन महिने पाच रुपयांनी देणार – मुख्यमंत्री
 • पोलीस आपल्या सर्वांचा भार स्वत:वर घेतायत.त्यामुळे त्यांच्याशी हुज्जत घालू नका
 • साखर कारखान्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्या
 • सरकार इतर राज्यातील कामगारांची सोय करत आहेत. 163 ठिकाणी केंद्र सुरू केली आहेत. त्यामुळे कुठेही जाऊ नका
 • देशभरात या विषाणूने थैमान घातलेय. कुणीही कुणाच्या मदतीला येणार नाही. हा आपला लढा आहे. आपल्यालाच लढायचा आहे.
 • उदय कोटक यांनी 10 कोटी दिले. बरेच जण पुढे येतायत, सर्व जण पुढे येतायत. आपली एक चांगली टीम तयार झाली आहे.
 •  जे व्हा मी आपल्याशी बोलत असतो तेव्हा माझ्यासोबत आपण सगळे जण आहात. माझ्यासोबत आपल्या महाविकास आघाडी सरकारमधील सगळे तिन्ही पक्ष आहेत, त्या पक्षांचे नेते आहेत. विरोधी पक्षनेत्यांसोबत सुद्धा माझी चर्चा सुरू आहे. राज ठाकरे सुद्धा फोन करून सूचना देत आहे.
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद
 • रेल्वेचे सर्व कर्मचारी एक दिवसाचा पगार पंतप्रधान सहायत्ता निधीला देणार. मदतीचा आकडा 151 कोटी
 • मुंबईत कोरोनामुळे एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू

 • महाराष्ट्रात कोरोनाबाबत खोट्या बातम्या पसरविल्याप्रकरणी 36 गुन्हे दाखल
 • नगरमधील पहिला करोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरा, हॉस्पिटलमधुन मिळाला डिस्चार्ज. महापालिका आणि आरोग्य विभागाने केले स्वागत.
 • कोरोना व्हायरसमुळे स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसाचा मृत्यू
 • आता आपण घऱात बंद आहोत पण काही दिवसांनी हेच हिंदुस्थानी सर्व भिंती तोडून देशाचा विकास घडवतील
 • कुणाही गरिबाला भुकेलं राहु देऊ नका, ही आपली संस्कृती आहे.
 • एका एका हिंदुस्थानीचा संकल्प आपल्याला या संकटातून बाहेर काढा
 • सोशल डिस्टंन्सिंग बढाओ, इमोशनल डिस्टंसिंग घटाओ – पंतप्रधान
 • क्वारंटाईनमध्ये असलेल्या लोकांना वाईट वागणूक दिली जात आहे. हे ऐकुन मला वाईट वाटलं. हा आजार पसरू नये म्हणून ते सर्वांपासून वेगळे राहत आहेत.
 • लॉकडाऊनमध्ये जे देशासाठी काम करत आहेत त्या सर्वांचे मी देशवासियांकडून आभार मानतो.
 • वैद्यकीय क्षेत्रासोबतच आपल्यासाठी दररोज अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या त्या सर्वांना सलाम
 • कोरोना व्हायरसविरोधात आपल्या आजुबाजुला असे अनेक रिअल हिरोज आहेत.
 • नर्सिंग समुदायासाठी ही मोठी परिक्षेची घडी आहे. मला विश्वास आहे की तुमच्यामुळेच आपण हा लढा जिकंणारच.
 • या आजाराची संख्या अचानक वाढते. आपण विदेशात पाहिलं की या आजारापुढे मोठ्या मोठ्या देशांनी गुडघे टेकले आहे. त्यामुळे काळजी घ्या, घराबाहेर पडू नका – पंतप्रधान
 • लॉकडाऊन हे तुम्हाला या संकटातून वाचविण्यासाठीच आहे – पंतप्रधान
 • आपण आतापर्यंत ज्या प्रकारे सहनशीलता दाखवली आहे ती पुढेही दाखवा. लक्ष्मण रेषेचे पालन करा.
 • देशभरातील सैनिक, नर्स, डॉक्टर , पोलीस आपल्या सर्वांसाठी लढत आहेत. आपल्यासाठी त्यांना त्यांच्या घरी राहता येत नाही. त्यामुळे आपण घरी राहिलं पाहिजे.
 • बरेच जण जाणूनबुजून नियम तोडत नाही. पण काही जण तसं करत आहेत. पण मला त्यांना सांगायचं आहे की जर त्यांनी ऐकलं नाही तर कोरोनापासून त्यांचे संरक्षण करणं कठिण होईल – पंतप्रधान
 • कोरोनाविरोधातील लढा कठिण आहे त्यामुळे असे कठिण निर्णय घ्यावे लागतायत
 • काही जण माझ्यावर रागवलेही असतील पण हा लढा लढण्यासाठी हे गरजेचे होते. – पंतप्रधान
 • लॉकडाऊनमुळे गरिब जनतेला त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यासाठी मी त्यांची माफी मागतो – पंतप्रधान
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात ला सुरुवात
 • देशभरातील मृतांचा आकडा 25 वर, कोरोनाग्रस्तांची संख्या 979 वर
 • जम्मू कश्मीरमध्ये कोरोनामुळे दुसरा मृत्यू
 • या सातपैकी चार रुग्ण मुंबईतील, 1 पुण्याचा तर उर्वरित दोन सांगली आणि नागपूरचे आहेत.
 • महाराष्ट्रात कोरोनाचे 7 नवीन रुग्ण सापडले, रुग्णांचा आकडा 193वर
 • अहमदाबाद येथील 45 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेहाचा त्रास होता. गुजरातमध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या पाच झाली आहे.
 • तेलंगणा राज्यात 53 जणांना कोरोनाची लागण
 • पुण्यात आतापर्यंत 36 रुग्ण कोरोनाबाधित, त्यापैकी 10 संपूर्ण उपचारांनंतर घरी
 • पुण्यातील पाच रुग्णांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह. रविवारी मिळणार डिस्चार्ज
 • 275 हिंदुस्थानी नागरिक इराणवरून राजस्थान येथे दाखल. सर्वांना लष्कराच्या आरोग्य केंद्रात ठेवलं जाणार
 • मृतांची संख्या 24वर
 • देशातल्या कोरोनापीडितांची संख्या पोहोचली 1000वर
 • इटलीत आतापर्यंत 10 हजार मृत्यू
 • गोव्यातील चर्चेसमध्ये रविवारचा मास लाईव्ह टेलिकास्ट केला जाणार, चर्चेसचा निर्णय
 • कोरोना व्हायरसविषयी पंतप्रधान जनतेशी संवाद साधणार
 • रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला संबोधित करणार आहेत
 • वसई विरार परिसरांत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 वर.
 • आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे 6 रुग्ण आढळले आहेत. आंध्र राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 19 वर गेली आहे.

 • बीसीसीआयकडून पंतप्रधान निधीला 51कोटींची मदत
 • महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 186 वर, आज आढळले 33 रुग्ण

 

 • अभिनेता वरुण धवन कडून पंतप्रधान रिलीफ फंडला व मुख्यमंत्री सहायता निधीला प्रत्येकी 25 लाखांची मदत

 • मुख्यमंत्री सहाय्यता निधी #COVID19 च्या नावाने स्वतंत्र बँक खात्याची निर्मिती; या खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

 • सर्व खासदारांनी त्यांच्या खासदार निधीतून प्रत्येकी 1 कोटी रिलीफ फंडाला द्यावे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे आवाहन
 • कोरोनाबाधीतांवर आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
 • अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या फंडातून 1 कोटींची मदत

 • टाटा सन्सकडून पंतप्रधान रिलीफ फंडसाठी एक हजार कोटींची मदत
 • हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 918 वर, 19 जणांचा मृत्यू

 • महाराष्ट्रातील मृतांचा आकडा 6 वर
 • अक्षय कुमारकडून कोरोना विरोधातील लढ्यासाठी 25 कोटींची मदत

 • स्पेनमध्ये गेल्या 24 तासात 832 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा 5690वर
 • राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पंतप्रधान सहायता निधीला तर आमदार मुख्यमंत्री फंडाला एक महिन्याचा पगार देणार

 • पंतप्रधानांकडून रिलिफ फंडाची स्थापना, आर्थिक मदत करण्याचे केले आवाहन

 • राजस्थानमध्ये दोन नर्सेसना झाली कोरोनाची लागण

 • मुंबईत कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळले, राज्याचा आकडा 167 वर

 • अहमदाबादमध्ये एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

;

 • देशभरातील 17 ऱाज्य कोरोनासाठी रुग्णालयं तयार करत आहेत.
 • देशभरात कोरोना व्हायरसचे रुग्ण हाताळण्याचे प्रशिक्षण ऑनलाईन दिलं जाणार
 • हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 873 वर
 • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथील विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून केली चर्चा. प्रत्येक विभागातील करोना व्हायरस संक्रमण व लोकांच्या स्थलांतराची घेतली माहिती.
 • कश्मीरमध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळले
 • देशातील सर्व वैद्यकीय फोर्सने सज्ज रहा – पंतप्रधान
 • पंतप्रधानांनी शनिवारी आयुर्वेद,योग, नेचुरोपॅथी, यूनानी आणि होमियोपॅथी डॉक्टरांनाही दिले सज्ज राहण्याचे आदेश
 • ज्या जिल्ह्यांमध्ये इतर राज्यांमधून किंवा इतर जिल्ह्यांमधून लोक प्रवेश करीत आहेत, त्यांना देखील थांबवून घेऊन त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले – राज्यपाल
 • सर्व मोठ्या शहरांमध्ये तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये सार्वजनिक उद्घोषणा करून स्थलांतर करीत असलेल्या लोकांना थांबण्याचा आग्रह करावा व त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शासन तसेच अशासकीय संस्था करीत असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांना अवगत करावे, असे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितले
 • रेल्वेच्या जुन्या प्रवासी गाड्यांचे विलगीकरण कक्षात रुपांतर

 • आपल्याला काही होणार नाही या भ्रमात राहू नका ;सरकारच्या सूचनांचे पालन करा – जयंत पाटील
 • कोरोनामुळे केरळमधील 69 वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू

 •  महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 159 वर

 • नगरमधील मार्केट यार्ड परिसरात गर्दी

 • बिलाची रक्कम थकित असूनही वीज वितरण कायम राहणार
 • कोरोनाग्रस्तांच्या वाहतुकीसाठी रेल्वेचे डबे निर्जंतूक करून सज्ज केले जात आहेत.
 • लॉकडाऊनमुळे भाज्यांचे भाव वधारले, चढ्या भावाने विक्री
 • हिंदुस्थानच्या वैद्यकीय संशोधन परिषदेने ( ICMR ) ही माहिती दिली आहे

 • लस चाचणीमध्ये हिंदुस्थानही सहभागी होणार असल्याची माहिती
 • जागतिक आरोग्य संघटना कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी घेणार आहे
 • झारखंडमध्येही एकही कोरोनाग्रस्त नाही, 137 जणांच्या चाचणी निगेटीव्ह आल्याची माहिती

 • 700 गाड्या मार्केटमध्ये आणि 400 गाड्या रस्त्यावरच उभ्या आहेत
 • वाशी Apmc मध्ये 1100 गाड्यांची आवक झाल्याने परिसर ठप्प झाला आहे
 • हे माहिती असूनही पत्रकाराने कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती
 • पत्रकाराची मुलगी ही लंडनवरून परतली असून तिला कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे
 • मध्य प्रदेशात पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
 • महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 159 पर्यंत पोहचला

 • राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 6 ने वाढ झाली
 • इटलीमध्ये एकाच दिवसात 1 हजार लोकांचा मृत्यू झाला

 • नवे रुग्ण घेण्यास मनाई केल्याने डॉक्टरचे अपहण केले

 • पिंपरीतील 14 कोरोनाबाधितांचा पहिला स्वॅब अहवाल निगेटीव्ह
 • डॉक्टरला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची अफवा पसरवली, महिलेला अटक

 • विरार जवळ मांडवी इथे अपघात झाला
 • 7 जण जागीच ठार झाले

 • पायी गावी निघालेल्या मजुरांचा मृत्यू
आपली प्रतिक्रिया द्या