
कोरोनाचा फैलाव अजूनही थांबलेला नाही. जगभरात तो वेगाने फैलावत असून अनेकांना बाधित करत आहे. या आजारामुळे जगभरात आतापर्यंत 3 लाखांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या ही देखील भयावह असून ती 44 लाखांपलिकडे पोहोचली आहे. सद्यस्थितीत अमेरिकेमध्ये या आजाराचा सर्वात जास्त उद्रेक पाहायला मिळतोय. एकट्या अमेरिकेत या आजारामुळे आतापर्यंत 84 हजार मृत्यू झाले आहेत तर 13 लाखांपेक्षा जास्त जण बाधित झाले आहेत.
चीनला ‘चक्रव्यूह’मध्ये घेरण्याची तयारी, हिंदुस्थानसह 7 देश हिशोब चुकता करण्यासाठी एकत्र
कोरोना व्हायरस ज्या वेगाने अमेरिकेमध्ये फैलावतो आहे ते पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेत 84 हजार 119 जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.
जगासाठी धोक्याची घंटा, ‘अमेझॉन’च्या जंगलातून कोरोनापेक्षा धोकादायक व्हायरस पसरण्याची शक्यता
या विषाणूमुळे आजारी पडलेल्यांची संख्या 13 लाख 90 हजार 406 इतकी झाली आहे. अमेरिकेनंतर कोरोनाचा जास्त फैलाव हा रशियामध्ये पाहायला मिळतोय. तिथे कोरोनाचे 2 लाख 42 हजार 271 रुग्ण सापडले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंड असून तिथे कोरोनाचे 2 लाख 30 हजार 986 रुग्ण सापडले आहे. या तीन देशांनंतर कोणत्या देशात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत ते पाहूयात
- स्पेन- 2 लाख 28 हजार 691
- इटली- 2 लाख 22 हजार 104
- ब्राझील- 1 लाख 90 हजार 137
- फ्रान्स- 1 लाख 78 हजार 184
- जर्मनी- 1 लाख 74 हजार 98
- तुर्कस्तान- 1 लाख 43 हजार 114
- इराण- 1 लाख 12 हजार 725
जॉन हॉपकीन्स विद्यापीठाच्या एका विभागाने जारी केलेल्या आकड्यांनुसार कोरोनामुळे अमेरिकेनंतर सर्वाधिक मृत्यू हे इंग्लंडमध्ये झाले आहेत. तिथे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ही 33 हजार 264 इतकी झाली आहे. त्याखालोखाल सर्वाधिक मृत्यू हे स्पेनमध्ये झाले असून तिथे या आजारामुळे 31 हजार 106 जण दगावले आहेत. स्पेनमध्ये 27 हजार 104 जणांचा तर फ्रान्समध्ये 13 हजार 240 जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.


























































