
दिल्लीतून 14 ऑगस्टला हाँगकाँगला गेलेल्या एअर इंडियाच्या विमानातील 14 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारपर्यंत 14 जणांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला, असे हाँगकाँग सरकारतर्फे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने हाँगकाँगाची उड्डाणे 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेकण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना निगेटिक्ह असलेल्या प्रवाशांनाच किमान प्रवासाला मुभा आहे. असे असताना दिल्लीतून गेलेले 14 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एअर इंडिया प्रशासन हादरले आहे. संबंधित प्रवाशांनी चाचणीचा अहवाल सादर केला होता की नाही याची माहिती उघड झालेली नाही.




























































