
गेल्या 18 तासात अमरावती शहरात कोरोनाचे एकुण 8 रुग्ण सापडल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या अमरावती शहरात 16 झाली आहे. त्यामुळे अमरावती शहर कोरोनाची रेड झोनमध्ये आले असल्यामुळे या ठिकाणी संचारबंदी अधिक कडक करण्यात आली आहे.
शुक्रवारी उशिरा रात्री आणखी दोन व्यक्ती पॉजिटीव्ह आल्यामुळे त्यांना येथील कोविड रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. यापैकी एक कोरोनाग्रस्त कमेला ग्राऊंड येथील असून दुसरा व्यक्ती फैजरपूरा येथील आहे. कमेला ग्राऊंड येथील रुग्ण 45 वर्षांचा असून फैजरपूरा येथील रुग्णाचे वय 66 वर्षाचे आहे. यापूर्वी याच परिसरात अनुक्रमे 20 तारखेला एका महिलाचे निधन झाले. तिच्याच घरात ४ हजर कोरोनाग्रस्त आढळून आले आहे. अमरावती शहरात कालरात्री दोन रुग्ण मिळाल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 16 झाली आहे. यात 5 जणाचा मृत्यू झाला असून 7 जण अद्यापही दवाखान्याता उपचारासाठी दाखल आहे. काल 4 कोरोनाग्रस्तांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान 4 रुग्णांना सुट्टी झाल्यानंतर लगेच 4 रुग्ण कोरोनाग्रस्त म्हणून भर्ती करण्यात आले आहे. काल रात्री पुन्हा 2 रुग्ण दाखल करण्यात आले आहे. अशा तर्हेने अमरावतीचा कोरोनाग्रस्ताचा आकडा 16 वर पोहोचल्या असल्यामुळे अमरावती शहर रेड झोन मध्ये आले आहे. अमरावती शहरात कोरोनाग्रस्ताचा आकडा रोजच वाढत असल्यामुळे आजपासून भाजीपाला विक्रीसह इतर दुकानाची सुध्दा सर्व व्यवहार ठप्प करण्यात आले आहे.
































































