घोड्यावर बसा, देशाची स्थिती बिकट हेच सत्य!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदीजी तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर बसा देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे हेच सत्य आहे. कोरोना, चीनसह अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकार साफ अपयशी ठरले आहे. त्या सगळ्या अपयशाला झाकण्यासाठीच केंद्र सरकारने सहा महिने संसदेचे कामकाज बंद ठेवले. त्या सगळ्या अपयशांवर संसदेत चर्चा होऊ नये, हीच त्यामागची भूमिका होती, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

केंद्र सरकारचे अपयश दाखविण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी खास फेसबुक पोस्ट केली आहे. केंद्र सरकारची स्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे. तुम्ही मोराबरोबर फोटो काढा, घोड्यावर बसा किंवा देवाची करणी म्हणा. तुम्हाला सध्याची स्थिती सावरता आलेली नाही. सरकार म्हणून ज्या अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करू शकलेले नाही. जगातील कोणत्याच देशाने कोरोनाला देवाची करणी म्हटलेले नाही. केवळ आपल्याच सरकारने ते स्पष्ट केले आहे, अशी जोरदार टीका अशोक चव्हाण यांनी मोदींवर केली आहे.

अपयश लपविण्यासाठी संसदेचे कामकाज बंद ठेवले

संविधानात सहा महिन्यापेक्षाही जास्त काळासाठी संसदेचे कामकाज बंद ठेवता येत नाही, तशी तरतूद केली आहे. त्यामुळे त्यांनी सहा महिने संपण्यापूर्वीच एकदा संसदेचे कामकाज सुरू केले. आता पुन्हा ते कधी सुरू करतील, याची गॅरंटी नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.