हिंदुस्थानी क्रिकेटपटूंच्या मानधनातही कपात?

कोरोनाचा फटका क्रीडाविश्वालाही बसला आहे. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या देशांतील क्रिकेट बोर्डांनी कर्मचारी व क्रिकेटपटूंच्या मानधनात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. काही कर्मचाऱयांना नोकरीवरून काढून टाकण्यात येणार आहे. या दोन देशांनंतर आता बीसीसीआयही क्रिकेटपटूंच्या मानधनात कपात करण्याच्या तयारीत आहे.

हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड हे तीन देश जागतिक क्रिकेट चालवत आहेत. म्हणूनच या तीन देशांना ‘बिगथ्री’ म्हणून संबोधले जात आहे. जर हे तीन बलाढय व धनाढय देश आर्थिक संकटात सापडले आहे, तर मग क्रिकेट या खेळाचा पाय खोलात गेलाय असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

आयपीएलमध्ये 15 ते 20 कोटींचा तोटा

आयपीएल स्पर्धा युएईत सुरू आहे. पण या स्पर्धेतील लढती प्रेक्षकांविना खेळवण्यात येत आहेत. त्यामुळे आयपीएल स्पर्धेदरम्यान किमान 15 ते 20 कोटींचे नुकसान झाल्याचे वृत्त मीडियामधून समोर आले आहे. तसेच बीसीसीआयने या मोसमात वीवोसोबत काडीमोड करून ड्रीम 11 या कंपनीसोबत करार केला आहे. येथेही बीसीसीआयला 200 ते 250 कोटींचा तोटा झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या