पालघर जिल्हयातील 18 निजामुद्दीन रिटर्नवाल्यांचा पोलीस घेत आहेत शोध

629
निजामुद्दीन तबलीग ए जमात (मरकज) येथून आलेल्या पालघर जिल्हयातील 18 जणांची यादी पालघर पोलिसांना प्राप्त झाली असून  पालघर जिल्हा पोलीस या सर्व 18  जणांचा तपास घेत आहे. यापैकी पाच जणांचा पोलिसांनी  शोध घेतला आहे. यातील दोघांना  विलगिकरण कक्षात ठेवले असून तिघांना अलगिकरण करण्यात आले आहे. उर्वरित 13 जणांचा पालघर जिल्हा पोलीस शोध घेत आहेत.
दिल्ली येथील निजामुद्दीन तबलीग ए जमात (मरकज) येथून आलेल्या पालघर जिल्हयातील 18 जणांची यादी पालघर पोलिसांना वरिष्ठ कार्यालयातून प्राप्त झाली असून यापैकी पाच जणांचा संपर्क झाला आहे. यातील दोघांना विविध ठिकाणी विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर तिघे अलगिकरणाअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी वैद्यकीय निगराणीखाली ठेवले आहे. विलगिकरण केलेल्या दोघांना वैद्यकीय पथकाकडून उपचार केले जात असल्याचे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले.
आपली प्रतिक्रिया द्या