क्वारंटाईन असेलल्या चाकरमान्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

705

मोरवंडे मोदगेवाडी येथील शाळेत क्वारंनटाईन केलेल्या एका 50 वर्षीय चाकरमान्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आनंद भुवड असे या चाकरमान्याचे नाव असून तो मुंबईत रहात होता.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपुर्वी मुंबईतून गावी आलेल्या आनंद भुवड याला उपजिल्हा रुग्णलयात क्वारंनटाईन करण्यात आले होते. दोन दिवसांपुर्वी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले. शुक्रवारी तो वाडीत आल्यानंतर त्याला येथील जिल्हा- परिषदेच्या शाळेत क्वारनटाईन करण्यात आले होते. शनिवारी 4 वाजेपर्यंत तो शाळेच्या पडवीत बसलेला ग्रामस्थांनी पाहीला होता. सायंकाळी त्याचे नातेवाईंक त्याला जेवण द्यायला गेले तेव्हा तो शाळेच्या खोलीमध्ये गळफास घतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला यांचा अद्याप उलगडा झालला नाही.

ग्रामस्थांनी याबाबत खेड पोलीस स्थानकात खबर दिल्यानंतर खेड पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शाळेच्या छताला लटकलेले आनंद भुवड याच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यावर रविवारी सकाळी त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर दुपारी मोरवंडे येथील स्मशानभुमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. क्वारंटाइन केलेल्या इसमाने आत्महत्या करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. खेड पालिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या