टेन्शन नही लेनेका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> हेमांगी ककी, अभिनेत्री

माझा लॉकडाऊन बराचसा काळ गावाला गेला. सातारा माझं गाव. गावकडची बातच न्यारी…मस्त, निवांत. सकाळी सहा- साडेसहाला उठायचे, चहा झाला की व्यायाम- मेडिटेशन करायचे. साडेनऊपर्यंत हे सगळं झाल्याकर मी बाहेर झोपाळ्यावर निवांत बसून राहायचे. दीड- दोन तास त्यात कसे जायचे कळायचं नाही. या दिवसांत माझ्या दृष्टीने खूप महत्काची गोष्ट घडली. लग्न झाल्यानंतर इतक्या वर्षांत मला आणि आईला गप्पा अशा मारायला मिळाल्या नव्हत्या. म्हणजे फोनवर बोलणं व्हायचं, धावती भेट व्हायची; मात्र ‘आता बसून बोलूया’ असं आमचं कधीच होत नसतं. या दिवसांत मात्र खूप शेअरिंग झालं. एकमेकींशी खूप बोलायचो. जेवण झालं की आम्ही दोघी मिळून जुने सिनेमा बघायचो. मग त्याच्यावरून सगळ्या आठवणी निघायच्या. मी दुपारी साडेचारनंतर मागच्या अंगणात जाऊन

बसायचे, तिथे वाचन करत बसायचे. इतरांसारखं धडाधड वेबसीरिज बघितल्या नाहीत. गावचं वातावरण खूप वेगळं होतं. आता मी मुंबईत परत आलेय.

या दिवसांत काहीतरी वेगळं करूया, असं काही मला काटलं नाही.पाककला शिकूया, हे करूया, ते करूया, असं मी काहीच केलं नाही. कदाचित हे माझं बोलणं तुम्हाला ’बोल्ड’ वाटेल, पण मी माझ्या जीवनात ’बॅकलॉग’ असा ठेकलेला नाही. जेव्हा जे जे वाटेल, ते ते मी त्या त्या वेळी केलंय… आणि करत आहे. त्यामुळे मला आता खूप वेळ मिळालाय, त्यामुळे बॅकलॉग भरून वाढायचाय, असं माझं काही झालं नाही. मला असाही खूप वेळ मिळतो, मी खूप भरमसाट सिनेमा किंवा मालिका करतेय, असं कधी झालं नाही.

कोरोनाचं संकट आहे. सगळ्या इंडस्ट्रीला ब्रेक लागल्यामुळे आर्थिक टेन्शन आहे, पण ते टेन्शन आता घेऊन काही अर्थ नाही. उगीच आताच आपल्या तब्येतीला कशाला त्रास… जे सुरू क्हायचंय तेव्हा सुरू होईल. आपण कितीही आटापिटा करून ते काही सुरू होऊ शकणार नाही. मग वेगळा काही मार्ग शोधायचा का वगैरे विचार येतात… पण आता लवकरच शूटिंग सुरू होणार आहेत अशी आनंदाची बातमी आहे.

लॉकडाऊनच्या काळाने आपल्याला काय शिककलं, यावर मी सांगेन की आपल्याला कळलंय की आपण कशाविना राहू शकतो. उदाहरणार्थ, मी इंटरनेटशिकाय राहू शकते. मी शॉपिंगशिवाय राहू शकते…तेच पुढे थोडं आणखी चालू ठेवलं की सोपं होईल. म्हणजे पुढचे सहा महिने किंवा एक वर्ष आपण आपल्यापुरतं पर्सनल लॉकडाऊन केला तर हे सुसह्य होऊ शकेल. या दिवसांनी मला वाट बघायची सवय लावली, संयम शिकवला. या गोष्टी माझ्यात कमी प्रमाणात होत्या. आता या सवयी पुढे अशाच राहतील, अशी आशा करते.