स्टॅम्प ड्युटी तीन टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हक्काच्या घराचे स्वप्न साकार करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने खूषखबर दिली आहे. यावर्षीच्या 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटीत 3 टक्क्यांची कपात करण्याच्या निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामुळे सध्या घर खरेदी करताना आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी 5 टक्क्यांवरून 2 टक्क्यांवर येईल.

कोराना आणि त्यामुळे पुकारण्यात आलेल्या या लॉकडाउनचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे.बांधकाम क्षेत्रही त्याला अपवाद नाही. तयातच या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.पगार कपातही झाली.साहजिकच आधीच मेटाकुटीला आलेल्या बांधकाम क्षेत्रातही मंदी आली आहे.घर खरेदी करणाऱ्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. स्टॅम्प ड्युटी कमी केल्याने साहजिकच या क्षेत्राला दिलासा मिळणार आहे.