
मुंबईतून कर्नाटकातील आपल्या मूळगावी कंटेनरमधुन जाणाऱ्या 50 वर्षीय प्रवाशाचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.बी.सी.केम्पीपाटील यांनी दिली.
मुंबईतून कर्नाटकातील मूळगावी कंटेनर मधुन जाणाऱ्या प्रवाशांना दि.16 एप्रिल रोजी अडवून रात्री छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यातील 12 जणांचे स्वॅब दि.17 एप्रिल रोजी घेतले होते. यातील 50 वर्षीय एकाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.
































































