पुण्यातील कोरोना ग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या बीडमधील तिघांवर करडी नजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Coronavirus scare
प्रातिनिधिक फोटो

दुबईहुन परतलेल्या पुण्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. यानंतर मंगळवारी या कोरोनाग्रस्त दाम्पत्याच्या मुलीला आणि ड्रायव्हरलाही कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. या कोरोना ग्रस्तांसोबत बीडचे तीन पर्यटनही दुबईतून परतले आहेत. मात्र त्यांच्यात कोणतेही लक्षण अद्याप आढळून आले नाहीत. मात्र परिस्थितीचे गांभीर्य पाहता आरोग्य विभाग या तिघांवर 28 दिवस करडी नजर ठेवणार आहे.

केरळात 6, कर्नाटकात 3 रुग्ण आढळले; हिंदुस्थानातील रुग्णांची संख्या 50 पार

पर्यटनासाठी 48 जण दुबईत गेले होते ते परतले आहेत. त्यातील पुण्याच्या चौघांना कोरोना लागण झाली. त्यांच्यासोबत बीडमधील तीन पर्यटक दुबईला गेले होते, ते बीडमध्ये परतले आहेत. आरोग्य विभागाने त्यांची तपासणी केली असून त्यांच्यात कोरोनाचे कोणतेही लक्षण नाहीत. ही बाब आशादायक असली तरी 28 दिवस आरोग्य विभाग त्याच्यावर करडी नजर ठेवून असणार आहे. लक्षण दिसताच त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले जाणार आहे. सध्या आठ ते दहा दिवसाचा कालावधी उलटून गेला आहे. अजून 18 दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. मात्र सध्या घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

इटलीत शिक्षणासाठी गेलेला राज्यातील विद्यार्थी घरी परतला, कुठलाही संसर्ग नसल्याचा अहवाल