मागाठाणेच्या शिवसेना शाखेत दवाखाना, ऑक्सिजन सेंटरचीही सुविधा

183

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बोरिवली, दहिसर, मागाठाणे या शिवसेना शाखांत दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. दहिसर पूर्वेकडील रावळपाडा शाखा क्र. 4 मध्येही मोफत दवाखाना सुरू करण्यात आला असून यामध्ये ऑक्सिजन सेंटरची सुविधाही रुग्णांना उपलब्ध करण्यात आली आहे.

दहिसरमध्ये आमदार विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनातून मागाठाणे विधानसभाप्रमुख उदेश पाटेकर व प्रभाग क्र 4च्या नगरसेविका सुजाता पाटेकर यांच्या पुढाकाराने दहिसर (पूर्व ) रावळपाडा येथील शिवसेना शाखा क्र 4 मध्ये शिवसेना शाखेतील दवाखान्याचा शुभारंभ आज शिवसेना सचिव सूरज चव्हाण, आमदार विलास पोतनीस, स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या दवाखान्यात विनामूल्य आरोग्य तपासणी, मोफत औषधांबरोबरच कोव्हिड संशयित रुग्णाकरिता ऑक्सिजनची सुविधादेखील सुरू करण्यात आली आहे. याकरिता शिवसेना शाखा क्र 4 मध्ये डॉ. सलिल सावंत यांच्यासह परिचारिका तैनात करून चार ऑक्सिजनच्या सुविधेसह बेडस् उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या