संभाजीनगर शहरात दीड हजार रूग्णांची स्कॅनिंग

756

शहरात कोरोनाचा कहर वाढला असून कोरोना विषाणुंचा संसर्ग झालेल्यांच्या संसर्गात आलेल्या रूग्णांच्या संख्येत संभाजीनगर शहरात झपाट्याने वाढ होत असून घाटी रूग्णालय आणि मिनी घाटी प्रशासनाने तब्बल दीड हजार रूग्णांची स्कॅनिंग केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन उपचार करणार्या 55 डॉक्टर आणि नर्सेसचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहे. तसेच घाटीत शंभर रूग्ण असुन यातील ७० रूग्णांचे स्वॉब तर मिनी घाटीतील 55 रूग्णांचे स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत तपासनीसाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

कोरोना विषाणुंचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन केलेले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी
रेल्वे, बस अणि प्रार्थना स्थळेही बंद करण्यात आली आहेत. गेल्या चार दिवसापासून रूग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. घाटी रूग्णालयात शंभर रूग्णांवर उपचार करण्यात येत असुन त्यातील ७० रूग्णांचे स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. तर मिनी घाटीत दीडशे रूग्णांवर उपचार सुरु असुन त्यातील ५५ रूग्णांचे स्वॅब देखील तपासनीसाठी पाठवण्यात आले असल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले. एकुण सव्वाशे रूग्णांच्या स्वॅबचा अहवाल दोन दिवसानंतर मिळणार असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

15 डॉक्टरचे स्वॉब घेतले

घाटी आणि चिकलठाणा येथील मिनी घाटीत कोरोना संशयीतांवर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सेस हे देखील आजारी पडत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. उपचार करणार्या डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग होवु नये याची दखल घेत प्रशासनाने वैद्यकीय मंडळातील १५ जणांचे स्वॅब घेतले असुन ते देखील पुण्याला पाठवण्यात आले असल्याचे प्रशासनाने सांगितले. यात डाॅक्टर आणि नर्सेसचा समावेश आहे. मिनी घाटीतील काही रूग्णांच्या स्वाबचा अहवाल दोन दिवसापुर्वी प्रशासनाला मिळाला असून यात एक रूग्णाला स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले आहे. मिनी घाटीत नऊ कोरोना संशयीतावर उपचार सुरु आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या