
कोरोनाबद्दल मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली जात आहे. तरीसुद्धा लोकांमध्ये भीती कायम आहे. त्यातच विविध अफवांना उत आला आहे. आहाराबद्दल दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. विशिष्ट फळे किंवा पदार्थ खाल्ल्यास कोरोनाची बाधा होत नाही असे संदेश व्हायरल होत आहेत, पण शाकाहार असो वा मांसाहार दोन्हीही रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यास उत्तम आहेत असे सर जे. जे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सांगितले आहे.
काय करावे…
- सॅनिटायझर नसेल तर साबणाने हात स्वच्छ धुवा
- बाहेरून आल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ केल्यास उत्तम
- शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरा
- सर्दी, खोकला, ताप असल्यास तातडीने तपासणी करून घ्या
- शाकाहार, मांसाहार दोन्हीही करा, पण ताजे व चांगले शिजवलेले अन्न खा
- भरपूर पाणी प्या
- वयोवृद्ध, आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या
काय करू नये…
- कोरोनाची बाधा न झालेल्या व्यक्तींनी विनाकारण मास्क वापरू नये
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका
- अफवांवर विश्वास ठेवू नका
- कोरोनाची लक्षणे आढळलेल्या व्यक्तीला डॉक्टरांकडे जाण्यास प्रवृत्त करा





























































