मुंबईतील खासगी रुग्णालयांत आयसोलेशन वॉर्ड्स सुसज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहरातील हिंदुजा, नानावटी, रहेजा, कोकिलाबेन, जसलोक, फोर्टिज, एच. एन. रिलायन्स या पंचतारांकित खासगी रुग्णालयांनीही आयसोलेशन वॉर्ड्सची व्यवस्था केली आहे. राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या रुग्णालयांना भेटी देऊन आयसोलेशन वॉर्ड्सची प्रत्यक्ष पाहणी केली. कोरोनाविरोधातील लढय़ात खासगी रुग्णालयांनी घेतलेल्या सहभागावर डॉ. सावंत यांनी समाधान व्यक्त केले.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारच्या आरोग्य यंत्रणेने हाती घेतलेल्या व्यापक मोहिमेत मुंबईतील खासगी रुग्णालयांनी सहभाग घेतला आहे. डॉ. सावंत यांनी संबंधित रुग्णालयांना भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. या वेळी रुग्णालयांना रुग्णांचे कपडे धुण्यापासून ते जेवणापर्यंतच्या महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पीपीई, मास्क आणि औषधांची उपलब्धता याबाबतही डॉ. सावंत यांनी रुग्णालय व्यवस्थापनाशी चर्चा केली.

  • कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात 17 बेड्स असून याठिकाणी व्हेंटिलेटर, निगेटिव्ह प्रेशर, एअर कंडिशन सायकलस आदी खबरदारी घेतली आहे.
  • हिंदुजा रुग्णालयात शास्त्र्ााrयदृष्टय़ा परिपूर्ण विलगीकरण कक्ष, वेगळा प्रवेश, टेस्टिंगची सोय केली आहे. तसेच एकूण 16 बेड्स आहेत.
  • नानावटी रुग्णालयाने युनिव्हर्सल स्क्रिनिंग सुरू केले आहे. तसेच 4 आयसोलेशन बेड्स व दोन आयसीयू बेड्स आहेत. इमर्जन्सीमध्ये बेड्सची क्षमता वाढवली जाईल, असे डॉ. अब्दुल अन्सारी आणि डॉ. दीपक पाटकर यांनी सांगितले.
  • रहेजा रुग्णालयात आयसोलेशनची व्यवस्था आहे. मात्र आयसीयूची सोय नाही. येथे 22 बेड्स आहेत.