जालन्यात तीसरा कोरोना संशयीत आढळला

818

घनसावंगी तालुक्यातील एका गावातील युवक चीनला गेला होता. चीनहून तो 4 मार्च रोजी कलकत्ता येथे विमानाने आला. त्यानंतर कलकत्त्याहून तो रेल्वेने मनमाडमार्गे संभाजीनगरला उतरला. 9 मार्च रोजी तो घनसावंगी तालुक्यातील आपल्या गावाकडे गेला होता. दोन दिवसांनंतर त्याला सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याने स्वतःहून मंगळवारी दुपारी जालना येथील जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल झाला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरु केले असून त्याचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान जालना शहरातील एका महाविद्यालयातील विद्याथ्र्यांचा अभ्यास दौरा 5 ते 13 मार्च दरम्यान गोवा येथे गेला होता. यामध्ये 29 विद्यार्थी आणि पाच शिक्षक कर्मचारी असे एकूण 34 जण गेले होते. ते परत आल्यानंतर मंगळवारी जिल्हा रुग्णालयात त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनाघरी पाठविण्यात आले. तर थांयलड येथे गेलेल्या सहा जणांची आरोग्य तपासणीही मंगळवारी करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या