व्होडका आहे कोरोनावरील औषध; या देशातील राष्ट्रपतीने केला दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना या आजारामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झालेला आहे. अनेक देश कोरोनावर मात करण्यासाठी औषधाचा शोध घेत आहेत. अशातच बेलारुसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांनी एक अजब दावा केलेला आहे. राष्ट्रपती अलेक्झांडर यांनी दावा केला आहे की, व्होडका हे कोरोनावरील औषध आहे. त्यांच्या देशात आतापर्यंत कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही आणि पुढेही होणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

पुढे अलेक्झांडर म्हणाले की, ‘व्होडका पिल्याने, ट्रॅक्टर चालवून आणि शेळ्यांसोबत खेळून हा आजार बरा होतो.’ ब्रिटिश मीडियामध्ये अलेक्झांडर यांना हुकूमशहा म्हटले जाते. त्यांच्यावर सातत्याने हा आरोप होत आहे की, ते डॉक्टर आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करीत आहेत आणि हा आजार गंभीरपणे घेत नाहीत. यातून बर्‍याच लोकांचा मृत्यू होऊ शकतो. राष्ट्रपती अलेक्झांडर यांनी देशात लॉकडाऊन लादण्यासही नकार दिला आहे. देशातील 95 लाख जनतेला संबोधित करताना ते म्हणाले आहेत की, आम्ही त्या औषधाचा शोध घेतला आहे ज्याने कोरोना आजार बरा होऊ शकतो.

65 वर्षीय अलेक्झांडर हे मागील 25 वर्षापासून बेलारुस देशात सत्तेत आहेत. दरम्यान, त्यांनी कोरोना औषधा बाबत विस्तारात सांगितलेलं नाही. मात्र ते म्हणाले आहे की, लोक घाबरलेले आहेत. यासाठी त्यांनी जनतेला सागितलं आहे की, देशात आतापर्यंत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही आहे.