शिवस्मारकाच्या बांधकामात भ्रष्टाचार, काँग्रेस व राष्ट्रवादीची केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsmarak

अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या शिवस्मारकाच्या कामामध्ये एक हजार कोटी रुपयांचा कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी एका पत्रकार परिषदेत केला. याबाबत केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रकल्पाची निविदेतील किंमत 2 हजार 692 कोटी 50 लाख रुपये होती, परंतु एल अँड टी कंपनीची निविदेतील बोली ही 3 हजार 826 कोटी म्हणजेच जवळपास 42 टक्के अधिक होती. त्यामुळे या प्रकल्पाची फेरनिविदा होणे आवश्यक होते. आराखडा बदलून ही रक्कम अंदाजित रकमेच्या 1 हजार कोटी रुपयांपेक्षाही कमी झाली आहे. परंतु एल अँड टीने आधीच फुगवलेली रक्कम आम्ही वाटाघाटीतून कमी केली आणि सरकारचा फायदा करून दिला असे सरकारकडून भासवले जात असल्याचा आरोप मलिक आणि सावंत यांनी यावेळी केला.