लग्नानंतर समजले की पती तृतीयपंथी आहे, त्यानंतर पत्नीने जे केले ते आहे धक्कादायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठ वर्षांचे अफेयर व त्यानंतर लग्न केले. मात्र मधुचंद्राच्या रात्री पती जवळ आला आणि त्याने जे सांगितले त्याने पत्नीला धक्काच बसला. तिचा पती हा पुरुष नव्हता तर तो तृतीयपंथी होता. मात्र इतक्या वर्षांचे प्रेम विसरायचे कसे… त्यामुळे तिने तिच्या पतीला समजून घ्यायचे ठरवले. तिने पतीची सर्जरी करायचे ठरवले. त्यानंतर रितसर शस्त्रक्रीया करून त्याने स्वत:ला महिला बनवले. आता त्या दोघींनी पुन्हा एकदा लग्न करायचे ठरवले असून सप्टेंबर महिन्यात त्या दोघी लग्न करणार आहेत.

ही गोष्ट आहे अमेरिकेतील 33 वर्षांच्या जॅक व 30 वर्षांच्या हार्वीची आहे. जॅक व हार्वी हे दोघे 2010 पासून एकमेकांना डेट करत होते. जॅक होता अमेरिकेचा तर हार्वी होती लंडनची. लाँग डिस्टन्स रिलेशनशीप त्या दोघांनीही चांगल्या प्रकारे निभवली व 2018 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न झालेही. मात्र लग्नाच्या पहिल्या रात्री हार्वीला जॅकने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे सत्य सांगितले. जॅकला पुढे आयुष्यात पुरुष नाही तर महिला बनून जगायचे होते. त्याची महिला होण्याची इच्छा हार्वीने समजून घेतली व तिने जॅकची शस्त्रक्रीया करायचे ठरवले.

हार्वीने जॅकच्या शस्त्रक्रीयेसाठी तब्बल 45000 पाऊंड़ डॉलर खर्च केले. त्यानंतर तिनेच त्याला महिलेसारखं जगायला शिकवले. त्याचे नावही तिनेच बदलले. तब्बल सहा महिने जॅकवर मेहनत घेतल्यानंतर जॅकची रिआना झाली. तो पूर्णपणे महिलेसारखं आयुष्य जगू लागला. लवकरच जॅक व हार्वी हे दोघे पुन्हा लग्न करणार आहेत.