लैंगिक शोषण प्रकरण- 6 वर्षे शिक्षा भोगणाऱ्य़ा तरुणाची निर्दोष मुक्तता! सत्र न्यायालयाकडून आरोपीची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या आईसोबत असलेल्या एका 13 वर्षीय मुलीचे सीएसएमटी रेल्वे स्थानकात लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाप्रकरणी 6 वर्षे तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्य़ा तरुणाला सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. पीडित मुलीचा व तिच्या पालकाचा ठावठिकाणा लागत नसल्याने तसेच आरोपीने निम्म्याहून अधिक वर्षे शिक्षा भोगल्याने विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

पीडित मुलगी दुसऱ्य़ा राज्यातून आपल्या आईसोबत महाराष्ट्रात आली होती. तिचे वडील तेहरान येथे इंजिनीअर असून ते विमानाने हिंदुस्थानात आले होते. सामान, पासपोर्ट, तिकीट आणि मूल्यवान वस्तू हरवल्याने दुसऱ्य़ा ठिकाणी राहण्याची सोय होत नाही यासाठी काही दिवस सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या महिला वेटिंग रूममध्ये राहण्यास आरोपीने सांगितले. एका रात्री आरोपी त्या मुलीशी अश्लील चाळे करत होता. मुलीच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर जीआरपी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.