बारावी परीक्षा – सीबीएसई मूल्यांकन फॉर्म्युल्यावर न्यायालयाची मोहोर

सीबीएसई बोर्डाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या मूल्यांकन फॉर्म्युल्यावर सर्वोच्च न्यायालयाने आपली मोहोर उमटवली आहे. सीबीएसईची गुणांकन पद्धत अंतिम असून यासंदर्भात भविष्यात कोणतीही याचिका स्वीकारण्यात येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सीबीएसई बोर्डाने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी दहावीतील एपूण गुणांच्या 30 टक्के, अकरावीतील 30 टक्के आणि बारावीतील विविध परीक्षांमधील मिळून 40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र या मूल्यांकन पद्धतीविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती सी. टी. रविपुमार यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने स्पष्ट केले की, ‘सीबीएसईची मूल्यांकन पद्धत आता अंतिम टप्प्यात असून यावर पुढील सुनावणी होणार नाही.’