
खंडणीचे गुन्हे दाखल असलेल्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय विनय सिंह याला दंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले होते. या आदेशाला विनय सिंह याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने याचिकेची दखल घेत विनय सिंह यांना फरार घोषित करण्याचा आदेश आज रद्द केला.
खंडणीप्रकरणी परमबीर सिंह, रियाज भाटी आणि विनय सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याचा तपास सीआयडीकडे हस्तांतरित केला होता.

























































