
फुप्फुसात 100 टक्के संसर्ग झालेल्या कोरोनाग्रस्त शेतकरी महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश आले. कोरोनाबाधित झाल्याने या महिलेचा एचआरसीटी स्कोअर 100 टक्के म्हणजेच 25 होता. या गंभीर परिस्थितीतून डॉक्टरांनी तिला बाहेर काढत तिच्यासह बाळाला जणू जीवदानच दिले आहे.
बारामती येथील मेहता हॉस्पिटलमध्ये 28 वर्षीय शेतकरी महिला प्रसूतीसाठी दाखल झाली. ही महिला मूळची शेतकरी कुटुंबातील असून तिला तीन वर्षांची एक मुलगी आहे. तिचे संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित होते. या महिलेलादेखील दाखल करताना कोविडमुळे ताप, खोकला, धाप लागणे असा त्रास होत होता. तसेच ऑक्सिजन पातळी 90 ते 92 दरम्यान होती. रुग्णालयात दाखल झाल्यापासून व्हेंटिलेटरवर असणाऱया या महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
बाळाला जन्म दिल्यानंतर ती महिला 13 दिवस व्हेंटिलेटरवर अतिदक्षता विभागात अत्यवस्थ होती. यादरम्यान डॉक्टरांनी न हरता संपूर्ण मेडिकल मॅनेजमेंटचा वापर केला. हाय रिस्क घेत वैद्यकीय काwशल्याचा वापर करीत रुग्ण महिलेला धोकादायक स्थितीतून बाहेर काढले. त्यासाठी केईएमचे डॉ. विवेक जोशी, डॉ. शुभांगी वाघमोडे आदी डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन महत्त्वाचा ठरल्याचे डॉ. विशाल मेहता सांगतात.
रुग्णालयात दाखल झाल्यावर दोन-तीन दिवसांनी तिची ऑक्सिजन पातळी आणखी खालावली. कोविड मेडिकल मॅनेजमेंटनुसार तिच्यावर उपचार सुरू केले. एचआरसीटी स्कोअर 25 असल्याने तिची अतिशय नाजूक अवस्था होती. रक्ताचे रिपोर्टदेखील चांगले नव्हते. त्यातच तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. मात्र पहिले सिझर असल्याचे आतादेखील सिझरच करणे गरजेचे होते. कोरोना संसर्गाचा धोका पत्करून गुंतागुंतीची शस्त्र्ाक्रिया पार पडली.
























































