कोव्हिशिल्डचा दुसरा डोस दोन महिन्यांनी द्या! नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुपची केंद्राला शिफारस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाप्रतिबंधक पहिला डोस घेतल्यानंतर कोव्हिशिल्डचा दुसरा डोस हा अंदाजे दोन महिने ते चार महिन्यांच्या अंतराने द्या, अशी शिफारस रोगप्रतिकारक शक्तीवर काम करत असलेल्या नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुपने केंद्र सरकारला केली आहे. कोरोना संसर्गाबाबत जागतिक संशोधनातून मिळालेल्या माहितीच्या निष्कर्षांवरून ही शिफारस करण्यात आली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी देशात 16 जानेवारी 2020 पासून लसीकरण सुरू झाले असून कोव्हिशिल्डचा दुसरा डोस सध्या तीन ते चार महिन्यांनी दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर या ग्रुपने केलेली शिफारस मान्य केली तर दुसरा डोस घेण्याचा कालावधी कमी होऊन तो दोन महिन्यांवर येणार आहे. मात्र भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस कधी घ्यावा याची या ग्रुपने कोणतीही शिफारस केलेली नाही. सध्या कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस 28 दिवसांनी दिला जात आहे. तीन ते चार महिन्यांनी डोस घेतल्यानंतर आणि दोन महिन्यांनंतर डोस घेतल्यानंतर व्यक्तीच्या अँटीबॉडीजमध्ये होणारे बदल हे सारखेच असल्याचे दिसल्यामुळे ही शिफारस करण्यात आली आहे. परदेशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात ज्या 6 ते 7 कोटी व्यक्तींनी दुसरा डोस घेतला नाही अशांना लस देऊन लसीकरणाला गती देता येणार आहे.