कोव्हिशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांनी मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे कोव्हिन डिजिटल पोर्टलवर बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस हा 84 दिवसांनी मिळणार आहे. डॉ. एन. के. अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील कोविड वर्पिंग ग्रुपने कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसची मुदत 12 ते 16 आठवडय़ांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. त्यानुसार कोव्हिन डिजिटल पोर्टलवर दोन डोसच्या कालावधीमध्ये बदल करण्यात आला आहे.

केंद्र शासनाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात माहिती दिली आहे. हा बदल होण्याआधीच ज्यांनी दुसऱया डोससाठी नोंदणी केली आहे त्यांना लस देण्यास सांगितले आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱया डोसच्या कालावधीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस हा पहिल्या डोसच्या चार ते सहा आठवडय़ांपर्यंत घेता येणार आहे.