देवगडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू

देवगड तालुक्यातील तळवडे भाकरवाडी येथील अशोक गणपत मोंडकर यांची गाभण गायीवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्यात जखमी झालेल्या गायीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी पहाटे 5 वाजण्या सुमारास मोंडकर यांच्या घराजवळ असलेल्या हापूस कलमाच्या बागेत घडली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या आधीही तळवडे लाडवाडी, घाडीवाडी येथील दोन बैलांवर हल्ला केल्याचे त्यांचा मृत्यू झाला होता. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली आहे. या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या