
सीपी राधाकृष्णन यांनी देशाचे 15 वे उपराष्ट्रपदी म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.
President Droupadi Murmu administers the Oath of Office to Vice President-elect C.P. Radhakrishnan.
(Pic Source: DD) pic.twitter.com/jO964aMt3t
— ANI (@ANI) September 12, 2025
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पद रिक्त झाले होते. यासाठी 9 सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांनी विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी त्यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर नवनिर्वाचित उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी बैठक बोलावली आहे.
#WATCH | C.P. Radhakrishnan takes oath as the 15th Vice President of India. President Droupadi Murmu administers the Oath of Office to him.
(Video Source: DD) pic.twitter.com/I91ezMHd2w
— ANI (@ANI) September 12, 2025
दरम्यान, सीपी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. देवव्रत हे 2019 पासून गुजरातचे राज्यपाल आहेत.
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार